Monday, 18 November 2024
Sunday, 4 August 2024
Sunday, 28 July 2024
Monday, 8 July 2024
Monday, 1 July 2024
Saturday, 1 June 2024
Friday, 10 May 2024
पितृअष्टक
*पितृअष्टक*
जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला
अशा नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||
इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग तो सदा दाखविला
कृपा हीच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||
मिळो सद् गती मज पितरांना
विनती हीच माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||
जोडून कर हे विनती तयांना
अग्नि वरूण वायु आदी देवतांना
सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||
वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना
सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना
मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||
करूनी सिध्दता भोजनाची तयांना
पक्वान्ने आवडीनें बनवून नाना
सदा तृप्ती होवो जोडी करांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||
मनोभावे पुजूनी तिला, यवाने
विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने
आशिष द्याहो आम्हा सकलांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||
सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा
न्यून काही राहाता माफी कराना
गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ |।
पितृ पंधरवड्यात रोज पठण करावे ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी निदान श्राद्धा चे दिवशी जरूर हे अष्टक म्हणावे.
*🌹🙏गुरुदेव दत्त 🙏🌹*
Subscribe to:
Posts (Atom)
Download Our Free App
श्रीदत्तात्रेयवज्रकवचम्
श्रीदत्तात्रेयवज्रकवचम् श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः । ऋषय ऊचुः । कथं सङ्कल्पसिद्धिः स्याद्वेदव्यास क...
-
श्रीदत्तात्रेयवज्रकवचम् श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः । ऋषय ऊचुः । कथं सङ्कल्पसिद्धिः स्याद्वेदव्यास क...
-
*दिवाली इन्फो काम की 7 बातें* 🌟 *ग्रीन पटाखे ही खरीदें, ऐसे पहचानें* दिवाली पर परेशानी का बड़ा कारण बनता है धुआं और प्रदूषण। ऐस...
-
*पितृअष्टक* जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर...