अतिक्रांत प्रेतसंस्कार विधी
सुमारे मागील दीड वर्षांपासून भारतात 'कोविड १९ (कोरोना)' नावाची महामारी सुरू आहे. तसे पाहता संपूर्ण जगभर ही महामारी सुरू आहे. आत्तापर्यंत भारतात लाखात या महामारीने मृत्यू झाले आहेत. प्रथम असे वाटत होते की, वयस्कर आणि दुर्धर रोग असणाऱ्या माणसांनाच ही महामारी होणार पण जसजसे दिवस- महिने गेले तसतसे असे लक्षात आले की, ही महामारी कोणाही व्यक्तीला होवू
गेल्या दीड वर्षात तरुणांपासून- वयोवृध्दांपर्यंत अनेकांचा यात मृत्यू झाला आहे. याने मृत्यू झाल्यावर कोणत्याही व्यक्तीचे प्रेत त्यांचे वारस-नातेवाईक यांना देत नाहीत. कारण त्याचे सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तीला ही महामारी होवू शकते. म्हणून ठरावीक लोक त्या प्रेताला अग्नि देण्याचे काम करीत आहेत. अनेक ठिकाणी अस्थि मात्र देत होते व देत आहेत. पण लॉकडाऊन आणि सरकारी नियम यामुळे दशक्रिया विधी कसे करावेत असा प्रश्न अनेकांसमोर आला होता आणि येत आहे. अनेकांनी या संदर्भात दूरध्वनी करून विचारणा केली. त्यांना निर्णय देणे आवश्यक होते. मुख्य प्रश्न असा होता की, अस्थि मिळाल्यावर दशक्रिया विधी दहाव्या दिवशी करता येत नव्हता तर तो विधी केव्हा करावा, की त्याचा लोप करावा.
मृत्यू झालेल्या दिवसापासून १० व्या दिवशी दशक्रिया विधी करणे हे एकदम १ बरोबर! पण आजच्या काळात ज्यांना हे करणे शक्य नाही ते पुढे सर्व परिस्थिती अनुकूल झाल्यावर करू शकतात.
थोडक्यात, इष्टवेळी प्रेतश्राध्द- सपिंडीकरण करणे शक्य नसल्यास पुढे करता येते. पण धर्मसिंधुतील "दशाहोत्तरं दिनं संशोध्येव ग्राह्यम" या वचनानुसार विहीत काल निघून गेल्यावर पुढे करावयाचे झाले तर वर्ज्य
मास, 1 नक्षत्रादि सोडून करता येईल.
वर्ज्य नक्षत्रे -
भरणी, कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, ज्येष्ठा, मूल, धनिष्ठाचा उत्तरार्ध, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती. गुरू-शुक्रास्त, पौष अधिकमास, वैधृति, व्यतिपात, परिघ योग, भद्रा (विष्टि) करण, द्विपुष्करत्रिपुष्कर योग हे वर्ण्य करून करावे. द्विपुष्कर, त्रिपुष्कर योगावर एखादी घटना घडली तर द्विगुण-त्रिगुण फळे मिळतात म्हणून वर्ण्य करावे.
प्रेतदाह वेळी पुरोहित मिळाल्यास समंत्रक प्रेतदाह करावा. अस्थि गोमूत्राने धुवून शुध्द करून मातीच्या किंवा तांब्याच्या कलशात ठेवून जमिनीत पुरून ठेवाव्यात, जमिनीत पुरणे शक्य नसल्यास एखाद्या कुंडीत मातीमध्ये पुरून ठेवाव्यात. दहा दिवस मृताशौच (सूतक) पाळावे, अकराव्या दिवशी पंचगव्य किंवा गोमूत्र प्राशन करून शुध्दि मानावी आणि नित्य व्यवहार सुरू करावेत.
'कोविड १९' महामारी स्थिती संपल्यावर अस्थि तीर्थक्षेत्री विसर्जित कराव्यात.
सरकारी नियमाप्रमाणे इतर कोणी दहन करून वारसदार किंवा अधिकारी व्यक्तीच्या हाती काही वेळा केवळ अस्थि सुपूर्द केल्या जातात. तसेच त्याच वेळी घरातील व्यक्ती विलगीकरणात असल्याने वेगळीच अडचण निर्माण होते. अशा वेळी सर्व अडचणी संपल्यावर अनुकूल काळ येताच वरील उल्लेखित दिवस वj करून पलाशविधी (म्हणजेच मंत्राग्नी) करून इतर दिवस कार्ये करावीत. या काळात विधी करणाऱ्या कर्त्याला कर्मांग अशौच राहील.
वरीलप्रमाणे कार्य केल्यास शास्त्राला बाधा येणार नाही आणि दशक्रिया (प्रेतश्राध्द) व्यवस्थित होईल व सरकारी नियमांचे सुध्दा पालन होईल.
www.astrotechlab.com
No comments:
Post a Comment