रुद्राक्ष माला
रुद्राक्षाच्या १०८ मण्यांची माला ही सर्वोत्तम मानली जाते. गळ्यात घालण्यासाठी २७ मण्यांची माला अत्यंत सोईची होते. या माळेच्या धारणाने अनंत पापांचे भस्म होऊन धारक सर्व प्रकारची सुखे उपभोगू शकतो. सर्व त्रास क्लेश दूर होतात. २७ प्रमाणे ३२ मण्यांची मालाही गळ्यात वापरतात. २२ मण्यांची माळ डोक्याभोवती बांधावी. ६ मण्यांची माळ कानाभोवती गुंडाळावी. १२ मणी मनगटातील माळेसाठी असावेत. तर १५ मणी दंडाभोवतालच्या माळेत असणे आवश्यक आहे. ३२ मण्यांची माला धनप्राप्तीसाठी वापरावी. १०४ मणी असलेली माला आरोग्यदायक असते तर १०७ मण्यांची माला धारकाला मोक्षाप्रत नेते. १०८ मण्यांची माला द्रव्य, सुख समृद्धी, मनःशांती देते. २४९ मण्यांची माला विशेष प्रकारचे प्रायश्चित्त घ्यावयाचे असल्यास लागते. निरनिराळ्या देवतांचे भक्त निरनिराळ्या संख्येच्या माळा वापरतात. उदा० श्रीरामाचे भक्त त्रयोदशाक्षरी मंत्राच्या जपासाठी ११३ मण्यांची माला वापरतात. श्रीकृष्णभक्त त्याच्या बारा अक्षरी जपामुळे ११२ मणी वापरतात. काही भक्त मंत्राची जितकी अक्षरे असतील तितकी शंभरात अधिक याप्रमाणे माला वापरतात. परंतु जपासाठी १०८ हा अविनाशी आकडा असलेले मणी वापरण्याचा सर्वसामान्य प्रघात आहे.
Online Astrology
www.astrotechlab.com
No comments:
Post a Comment