जगातील अब्जाधीशांच्या कुंडलीत प्रभावी ठरतात राशी!
नवी दिल्ली, 6 जानेवारी
जगात अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जिला श्रीमंत बनण्याची इच्छा नसेल. काही लोक यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचतात. बरेच लोक यश आणि संपत्ती याबाबत नशीबाचा मुद्दा मानत नाहीत. पण, फोर्ब्स मासिकाने 2019 च्या यादीनुसार, जगभरातील अब्जाधीशांच्या राशी जाणून पाहिल्या आणि 250 अब्जाधीशांपैकी 27 जणांची राशी तुळ असल्याचे लक्षात आले.
सध्या श्रीमंतांच्या यादीत अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती आणि टेस्लाचे संस्थापक, सीईओ एलन मस्क यांचा बोलबाला आहे. त्यांची संपत्ती 278 अब्ज डॉलर्स असून, त्यांची राशी कर्क आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची राशी मकर आहे. त्यांच्याकडे जवळपास 202 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
जगातील आघाडीच्या एलव्हीएमएचचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट यांची मिन रास असून, त्यांची संपत्ती 170 अब्ज डॉलर्स आहे. वृश्चिक रास असलेले मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याकडे 137 अब्ज डॉलर्स संपत्ती आहे.
जगातील धनकुबेरांच्या यादीत लॅरी पेज यांचेही नाव समाविष्ट आहे. त्यांनी सर्गी ब्रिन यांच्यासह गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट बनविली होती. त्यांची रास मेष आहे. त्यांचे भागीदार सर्गी ब्रिन यांची राशी िंसह आहे. वृषभ रास असलेले फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती 121 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 2000 ते 2024 दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सीईओ राहिलेले स्टीव्ह वॉल्मर यांची स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी असून त्यांची राशी मेष आहे. वॉरेन बफेट यांची राशी कन्या असून, ते जगातील सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 119 अब्ज डॉलर्स आहे.
अभिजित वर्तक
दैनिक तरुण भारत, नागपूर
No comments:
Post a Comment